प्रेक्षकांनीच आम्हाला घडवलं आहे – जावेद अख्तर

825

प्रेक्षकांनीच आम्हाला घडवलं आहे – जावेद अख्तर

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरूच असून या विषयाला सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे. आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट आदी स्टार कलाकारांना बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर धक्का बसला. सोशल मीडियावर सर्व स्टार किड्स घराणेशाही बाबत व्यक्त होतांना दिसत आहे.

याच मुद्यावर आता बॉलीवूड जावेद अख्तर म्हणाले,’ लोक घराणेशाही या संकल्पनेला घेऊन गोधळात आहे. मुळात चित्रपट सृष्टीत घराणेशाही नाहीच , पुढे ते म्हणाले ‘चित्रपट बनतात ते चित्रपट प्रेक्षक तिकीट काढून बघतात, प्रेक्षक चित्रपट पाहता आणि त्यांचा आनंदसुद्धा लुटता. त्यामुळे प्रेक्षकच प्रत्येक चित्रपटात काम करणाऱ्याला आम्हाला घडवू शकतात. त्यामुळे येथे घराणेशाहीचा वाद निर्माण होतच नाही.

सोशल मीडियावर सर्व स्टार किड्स घराणेशाही बाबत व्यक्त होतांना दिसत आहे. मात्र या स्टार किड्सला त्यांचा चित्रपटाना दाद देऊन प्रेक्षकांनी घडवलं आहे, आणखी कोणी नाही. जे लोक आता आमच्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांनीच आम्हाला स्टार बनवलंय.असं ही ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here