प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा; उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त, गुन्हा दाखल

330

अहमदनगर – महाराष्ट्रात राज्यात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे जप्त करण्यात आला.

दामू पुंजाराम जाधव व रामू पुंजाराम जाधव राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव परिसर, अहमदनगर येथून हा साठा जप्त करण्यात आला. परराज्यातील विदेशी मद्यसाठा बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या कार्यालयाच्या वतीने सुरू असल्याची माहिती अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here