अहमदनगर – १० जानेवारी रोजी आपली ड्युटी संपल्यानंतर सकाळी १० च्या सुमारास आपल्या मित्राबरोबर घरी जात असताना आदिनाथ दिनकर शिरसाट यांना चांदणी चौकातील वळणावर जामखेड रोड कडुन समोरून येणारी एक मोटार सायकल वरील इसमाने जोराची धडक दिल्याचे कारणा वरुन त्यांचेत वाद झाले. या वादामुळे आदिनाथ आपल्या मित्रासह कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरीता येत असताना आरोपी व त्यांचे साथीदार यांनी संत आण्णा चर्च येथे थांबवले असता मी पोलीस असल्याचे सांगुन देखील आरोपीनी फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण करून त्यांचे पॅन्टचे खिशातील ठेवलेला MI Note मोबाईल फोन व २० हजार रुपये रोख रक्कम ही बळजबरीने काढुन घेवून मोटार सायकल वरून जाताना त्यातील एकाने फिर्यादी यांना ” आता तु निंबोडीत ये मोबाईल व पैसे घेण्यासाठी मग पाहतो तुझ्याकडे ” असे म्हणुन सदर ठिकाणा वरून फरार झाले. अशी फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे बोरीबेल (ता दौंड जि पुणे) येथे आहेत त्या वेळी पोनि शिंदे यांनी तात्काळ तपासी अधिकारी सपोनि रविंद्र पिंगळे व गुन्हे शोध पथकाती कर्मचारी यांना रवाना केले त्यावरुन सदर ठिकाणी सपोनि पिंगळे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घेथुन मोठ्या शिताफिने बोरीबेल (ता दौंड येथुन आरोपीना ताब्यात घेतला.
श्याम बाबासाहेब जाधव (वय २० वर्ष) रोहन राजू जाधव (वय २० वर्ष) दिपक कचरु माळी (वय २० वर्ष ) विकास लक्ष्मण भालेराव (वय २१ वर्ष सर्व रा निंबोडी ता नगर जि अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे , सपोनि रविंद्र पिंगळे , चापोहेकाँ सतिश भांड , पोना योगेश भिंगारदिवे , पोना गणेश धोत्रे , पोना योगेश कवाष्टे , पोना नितीन शिंदे , पोना सलिम शेख , पोना संतोष गोमसाळे , पोकाँ अभय कदम , पोका दिपक रोहकले , पोको अमोल गाढे , पोकौं सोमनाथ राउत , पोकाँ अतुल काजळे , पोकाँ संदिप थोरात व सायबर पोस्टेचे पोकौं राहुल गुंडू , पोकों प्रशांत राठोड यांनी केली आहे.