पुणे : किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात पुण्यातील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. परवेज ग्रेट, रेबेका जॉन (डेप्युटी डायरेक्टर मेडीकल सव्हिर्सेस), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे (कन्सलटंट नॅफ्रोलॉजिस्ट), डॉ. मुफ्त भाटी (युरोलॉजिस्ट), डॉ. हिमेश गांधी (युरोलॉजिस्ट), सुरेखा जोशी (ट्रान्सप्लांट कॉर्डीनेटर) यांच्यासह अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, अण्णा साळुंखे, शंकर पाटील, सुनंदा पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे. फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला १५ लाखांचे आमिष दाखून रुबी हॉलमध्ये किडणी प्रत्यारोपण केले. यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून फसवणूक केली होती. साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. त्यांनतर रुबी हॉल क्लिनिकमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले.सुतार या महिलेला साळुंखे याने १५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. मात्र, ते पैसे न दिल्याने सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर हा किडणी तस्करीचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणात आता रुबी हॉल रुग्णालयाच्या डॉक्टरांसह कायदेशीर सल्लागार यांच्यावर फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये ज्या महिलांनी पैशासाठी किडनी विकली त्या महिलेला देखील आरोपी करण्यात आले आहे. किडणी प्रत्यारोपनाचा गैरप्रकार हा रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये घडल्यामुळे संबंधित रूग्णालयचे व्यवस्थापकीय विश्वस्त हेदेखील जबाबदार असल्याने त्यांचेही नाव या गुन्हात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास कोरेगांव पार्क पोलिस करत आहेत.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
केंद्र सरकारने ‘या’ कर्मचाऱ्यांना दिली आनंदाची बातमी; मिळणार तब्बल दोन वर्षांची अतिरिक्त रजा
ऑल इंडिया सर्व्हिसच्या सर्व सदस्यांना केंद्र सरकारकडून सुट्टीच्या अनुषंगाने नियम आणि संशोधन करण्यात आलं आहे. या सर्व...
2002 मध्ये दंगलखोरांना धडा शिकवला, भाजपने शांतता आणली: अमित शहा गुजरातमध्ये
खेडा जिल्ह्यातील महुधा शहरात एका निवडणूक सभेत अमित शहा बोलत होते.
नवी दिल्ली: गुजरातमधील जातीय दंगलींना जबाबदार असलेल्यांना...
नगर तालुक्यातील दुर्दैवी घटना, गणेश विसर्जनानंतर ट्रॅक्टरखाली सापडून अभियंत्याचा मृत्यू
अहिल्यानगर : गणेश विसर्जनानंतर ट्रॅक्टर वळविताना तो उलटल्याने त्याखाली सापडून तरुण बांधकाम अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना...