पुणे: पुण्यात सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल; कर्ज खाते काढून 2.5 कोटी रुपयांची फसवणूक

पुणे: पुण्यात सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल;

कर्ज खाते काढून 2.5 कोटी रुपयांची फसवणूक

पुणे : बँकेच्या चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक व इतरांनी संगनमत करुन परस्पर कंपनीचे बनावट कर्ज खाते काढले. हे कंपनीचेच कर्ज खाते आहे असे भासवून ते खाते NPA झाल्याचे जाहीर करुन कंपनीची मालमत्ता हडप करण्याचा तसेच सुरक्षा (तारण) म्हणून दिलेल्या धनादेशाद्वारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सारस्वत बँकेच्या (Saraswat Bank) चेअरमनपासून व्यवस्थापकीय संचालक, झोनल व्यवस्थापकासह 8 जणांवर कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. न्यायालयाने सीआरपीसी कलम 156 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर सदरील गुन्हा दाखल झालेला आहे. सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम एकनाथ ठाकूर Gautam Eknath Thakur (रा. एकनाथ ठाकूर भवन, प्रभादेवी), व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने (Smita Sandhane), वसुली अधिकारी आनंद चाळके (Anand Chalke), झोनल व्यवस्थापक पल्लवी साळी Pallavi Sali (रा. चिंचवड), शाखा व्यवस्थापक अभिषेक भगत Abhishek Bhagat (रा. विश्रांतवाडी), झोनल व्यवस्थापक रत्नाकर प्रभाकर Ratnakar Prabhakar (रा. एरंडवणा) व इतर अशी गुन्हा (Pune Crime) दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्मिता समीर पाटील Smita Sameer Patil (रा. कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 ऑगस्ट 2018 ते 10 जानेवारी 2020 दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीचे सारस्वत बँकेच्या (saraswat cooperative bank) विश्रांतवाडी शाखेत टर्म लोनचे खाते आहे. असे असताना बँकेचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालय व इतरांनी संगनमत करुन फिर्यादीच्या कंपनीच्या नावाने खोटे व बनावट कर्ज खाते कंपनीच्या संमतीशिवाय काढले. ते खाते हे कंपनीचेच कर्ज खाते (Loan Account) आहे, असे भासवले. फिर्यादी कंपनीचे आजी माजी संचालक व जामीनदार यांना 23 ऑगस्ट 2018 रोजी 13 कोटी रुपयांचे वन टाईम सेटलमेंट प्रस्ताव दिला. कंपनीने त्यांच्या टर्म लोनच्या अधिकृत खात्यासाठी सुरक्षा म्हणून विना तारखेचे 6 धनादेश दिले होते. त्यातील एका धनादेशावर दीड कोटी रुपये व बँकेच्या अधिकृत कर्ज खात्यावर भरण्याकरीता दिलेल्या धनादेशावर 1 कोटी रुपये एवढी रक्कम लिहून कंपनीच्या नावाने काढलेल्या खोट्या व बनावट कर्ज (Fake Loan Account) खात्यावर भरले (Fraud Case). त्या रक्कमेचा आरोपींनी स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी वापर करुन फिर्यादीच्या कंपनीची अडीच कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here