पुणे – पुणे – अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रक, टू-व्हीलर आणि फोर व्हीलर कारमध्ये हा विचित्र अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास घडला आहे. या भीषण अपघतामध्ये पाच जणांचा जागीच मुत्यू झाला आहे. तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ट्रक, टी व्हिलर आणि फोर व्हिलर एकमेकांवर आदळल्याने ही घटना घडली. या दुर्घटनेत एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसेच यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 19 जानेवारी रोजी तीन गाड्यांचा असाच एक भीषण अपघात झाला होता. मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावर हा अपघात घडला होता. यामध्ये ट्रक चालकाचे आपल्या गाडीवरील नियत्रंण अचानकपणे सुटले होते. पुढे जात असलेल्या दोन गाड्यांना या ट्रकने जोरदार धडक दिली होती. या अपघातात ट्रक रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळला होता. यामध्ये ट्रकची मोठी नासधूस झाली होती.












