अकोला,दि.५ – शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जा ये करणे सोपे व्हावे, तेथील मालाची, खते बियाणे, अवजारे यंत्रे यांची वाहतुक करणे सोपे व्हावे यासाठी शेतापर्यंत जाणारे पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक असून जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी , असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पाणंद रस्ते तयार करण्याच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की, पाणंद रस्त्यांच्या विकासाचे जाळे जिल्ह्यात निर्माण करणे आवश्यक आहे. पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात गाव समित्यांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करा. रस्त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्गीकरण करुन प्राधान्यक्रम ठरवा. या रस्त्यांसाठी लागणारे खडी मुरुम आदी गौणखनिज उपलब्धतेसाठी एकाच जागेची निवड करुन उत्खननानंतर त्या जागेवर जलसंधारण उपचार करावे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी स्तरावर बैठकांचे आयोजन करुन प्रस्ताव तयार करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.तसेच जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असलेली १०२ गावे निवडून त्यात पाणंद रस्ते विकासासोबत इ- क्लास जमिनीची माहिती, गावात वृक्ष लागवड, गावतलाव विकास, ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम, गावातील नाल्यांचे खोलीकरण रुंदीकरण, बाजार ओटे तयार करणे, व्यायामशाळा, वाचनालय, सभागृह इ. सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.
Home महाराष्ट्र अकोला पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवापालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
भारत आणि चीनची क्षेपणास्त्रेही तैनात
?? भारत आणि चीन सीमेवर तणाव कायम असताना प्रत्यक्ष ताबारेषेवर भारताने ब्रम्होस, निर्भय आणि आकाश ही क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. चीनने क्षेपणास्त्र...
International : तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला हिरवा कंदील
International Flights Resumed : परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली बातमी आहे. तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 27 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला हिरवा...
कानपूर पुरुषाने पत्नीला मारहाण केली, 2 मुलांचा मृत्यू, नंतर आत्महत्या: पोलीस
येथील कानपूर देहाट परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून...
16 Sailors Detained In Equatorial Guinea, India Working To Free Them
New Delhi:
Sixteen Indian sailors are reportedly in detention in Equatorial Guinea and the...