पहा आज दिनांक १३ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा पर्यंतचा अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित यांचा अहवाल व डिस्चार्ज झालेल्या बद्दलची माहिती
दिनांक: १३ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा
आज तब्बल ७१९ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
आतापर्यंत २६ हजार १५६ रुग्ण बरे होऊन परतले घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.९३ टक्के
आज ७८२ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ७१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार १५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१६४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३६ आणि अँटीजेन चाचणीत २८३ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, संगमनेर ०१, राहाता ०२, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण २९, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा २०, श्रीगोंदा ११, पारनेर १४, शेवगाव २४, कोपरगाव २५ आणि जामखेड ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३३६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८४, संगमनेर ०७,, राहाता ७६, पाथर्डी १५, नगर ग्रामीण २३, श्रीरामपुर १८, कॅंटोन्मेंट ०४, नेवासा १५, श्रीगोंदा ०७, पारनेर ३२,अकोले ०२, राहुरी ४०, शेवगाव ०५, कोपरगांव ०६, जामखेड ०१ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २८३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ४१, संगमनेर ०१, राहाता २७, पाथर्डी १५, श्रीरामपूर ०१, श्रीगोंदा ४१, पारनेर २८, अकोले ११, राहुरी ३०, शेवगाव १८, कोपरगाव २२, जामखेड २१ आणि कर्जत २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ७१९ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा ३०९, संगमनेर ०६, राहाता ३२, पाथर्डी १३, नगर ग्रा.५७, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट ०७, नेवासा ०६, श्रीगोंदा २२, पारनेर ३४, अकोले ०४, राहुरी ३३, शेवगाव ७३, कोपरगाव ४३, जामखेड २१, कर्जत २४ आणि मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: २६१५६
उपचार सुरू असलेले रूग्ण:४१६४
मृत्यू:४७७
एकूण रूग्ण संख्या:३०७९७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
STAY HOME STAY SAFE
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका
महा 24 न्यूज़












