नेवासा- गेल्या वर्षी जून महिन्यात तालुक्यातील दिघी शिवारात विषारी औषध प्राषण करुन आत्महत्या केल्या प्रकरणी काल मंगळवारी सदर मयत व्यक्तीच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन एका महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेला अटक करण्यात आली.
याबाबत मिना सुनील ऊर्फ संतोष चव्हाण (वय ४५). रा. दिघी शिवार ता. नेवासा हिने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, उषाबाई ऊर्फ बिन्नी विलास ब्राम्हणे रा. दिघी शिवार ता. नेवासा ही फिर्यादीचा पती सुनील ऊर्फ संतोष जीवलाल चव्हाण यास तू तुझ्या बायकोला सोडून दे असे म्हणून त्रास देत होती. या त्रासास कटाळून फिर्यादीचा पती सुनील ऊर्फ संतोष जीवलाल चव्हाण याने ३० जून २०२१ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.
या फिर्यादीवरुन काल २५ जानेवारी २०२२ रोजी उषाबाई ऊर्फ बिन्नी विलास ब्राम्हणे हिच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०६ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. के. थोरात करत आहेत.