नीट ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना .
येत्या १३ सप्टेंबर रोजी देशभरात मेडिकल ला जाण्यासाठी नीट हि राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा होणार आहे .त्या निमित्ताने मला अनेक पालक व विद्यार्थ्यांचे मला फोन आले व प्रवेश परीक्षेच्या वेळी काय करावे लागेल ,कधी जायचे आहे ? ड्रेस कोड काय आहे असे अनेक प्रश्न पालक व विद्यार्थ्यांच्या मनात आहेत . गेली अनेक वर्षे मी विविध प्रवेश परीक्षा जवळून अनुभवल्या आहेत त्या मुले मी काही उपयोगी सूचना करू इच्छिते . सर्वप्रथम कोणकोणती कागदपत्रे बरोबर घेऊन जायची आहेत ते सांगते .
१) एन.टी.ए. मार्फत आलेले प्रवेश पत्र ज्या मध्ये सेल्फ डिक्लरेशन अंडरटेकिंग आहे ते स्व हस्ताक्षरात सही करून देणेचे आहे . त्यामध्ये जर तुम्हाला ताप , सर्दी , खोकला , अंगदुखी , धाप लागणे सारखी लक्षणे असल्यास तसा उल्लेख करावा लागणार आहे . तसेच जर तुम्ही जर कोविड १९ रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर तसा उल्लेख करायचा आहे . त्याच प्रमाणे तुम्हाला काही ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर तसा उल्लेख करायचा आहे . जर वरील कोणतेच नसेल तर मग सी कॉलम मध्ये दिलेल्या चेक बॉक्स मध्ये टिक करा . तुमचे प्रवेश पत्र ३ पानाचे आहे ते सगळे बरोबर घेऊन जायचे आहे .
२)बरोबर एक पासपोर्ट साईझ फोटो जो कि तुम्ही प्रवेश पत्रावर अपलोड केलेला तोच आसणे गरजेचे आहे .
३)प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताचा अंगठ्याची निशाणी उठवणे गरजेचे आहे .
४)प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हॉल तिकीट वर आधी सही करु नये . सदर सही हि पर्यवेक्षकाच्या समोर करावयाची आहे.आधी सही करून गेलात तर तुम्हाला प्रवेश नाकारु शकतात याची नोंद घ्यावी. हॉल तिकीटाची एक प्रत घरी काढून ठेवावी. कारण तुमचे हॉल तिकीट जमा करून घेतले जाणार आहे .
५) परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्र परिसरातील झरोक्स सेंटर बंद असतात याची नोंद ठेवावी .
६) हॉल तिकीट सोबत शासनाने दिलेले ओरिजनल फोटो आयडी कार्ड जसे की आधार / पॅन / १२ वीचे हॉल तिकीट / पासपोर्ट या पैकी कोणतेही एक बरोबर ठेवा , इतर कोणतेही फोटो आयडी कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही . तसेच झेरॉक्स काढलेले व अटेस्टेड केलेले / मोबाईल वरील कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही .
७) दिव्यांग विद्यार्थ्याने सोबत त्याचे दिव्यांगांचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जनाचे असणे गरजेचे आहे .
८)ड्रेसकोड हा फॉर्मल असावा . लांब बाह्यांचा शर्ट / T शर्ट / कुर्ता चालणार नाही . मोठ्या बटणाचा शर्ट चालणार नाही .
९) अंगावर कोणताही दागिना चालणार नाही जसे कि ईअर रिंग / अंगठी / बांगडी / चेन / पैंजण इत्यादी .
१०)हॉल तिकिटावर काहीही लिहू नये .
११) पारदर्शक पाण्याची बाटली नेऊ शकता . (रंगीत किंवा अपारदर्शक चालणार नाही.)
१२) ५० मिली सॅनिट्झर बॉटल शक्यतो जेल स्वरूपात न्या कारण चुकून परीक्षा देत असताना जर टेबलावर सांडली तर दुसरी ओएमआर शीट मिळणार नाही .
१३) डिस्पोझेबल मास्क व हॅन्ड ग्लोव्हज बरोबर न्या कारण तुमचा मास्क तिथे काढून घेतला जाणार असून तुम्हाला दुसरा मास्क मिळणार आहे . तिथे मिळालेल्या मास्क ला तुमच्या सॅनिटाझरने आधी साफ करून घ्या मग नंतरच परिधान करा हि सूचना .
१४) रिपोर्टींग / एन्ट्री टेमिंगलाच केंद्रावर पोहोचा .
१५) सकाळी हलकासा आहार करून जा कारण संद्याकाळी ५ वाजल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडता येणार नाही . सोबत पाण्या ऐवजी सरबत नेले तर जास्त बरे होईल कारण त्यातील लिंबू व साखरेने थोडे तरतरी आल्यासारखे वाटेल . सोबत थोडे मनुके खाऊन जा म्हणजे लगेच भूक लागणार नाही .
१६) सोबत नेलेल्या सॅनिटायझर्स ने आधी आपला बेंच साफ करून घ्या .
१७) फक्त चप्पल घालून जाणे , सॅंडल किंवा शूज वर बंदी आहे .
१८) मोबाईल बरोबर नेऊ नये . मोबाईल ठेवण्याची सोय नाही .
१९) जर तुमच्या शरीराचे तापमान निर्धारित टेम्परेचर च्या पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वेगळ्या आयसोलेशन कक्षा मध्ये बसावे लागेल . त्यावेळी घाबरून जाऊ नका . शांत पणे परीक्षा द्या .
२०) अस्वस्थ वाटल्यास डीप ब्रीदिंग करा .
२१) प्रत्येक विद्यार्थ्यांच रिपोर्टींग टाइम हा वेगवेगळा आहे . त्या मुळे आपल्या मित्राचा रिपोर्टींग टायमिंग काय आहे यावर आपले जाणे ठरवू नका .
माझ्या तर्फे तुम्हाला नीट या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा . सध्याच्या परिस्थिती मध्ये जगाला तुमच्या सारख्या डॉक्टर लोकांची तीव्र गरज भासणार आहे . आपणास काही शंका आल्यास मला नक्की विचारा . सर्व भावी डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा
सौ: संगिता ताई हिवाळे
मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली तालुका हवेली महिला जनसंपर्क अधिकारी जिल्हा पुणे…