निमगाव येथील ओढ्यात तरूणाचा बुडून मृत्यू
निमगाव शिवरात लगत असणाऱ्या ओढ्यात मुकुंद नगर येथील 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला
अधिक माहिती अशी की नासिर शेख वय वर्ष 20 हा नगर येथील उद्योगिक क्षेत्रात काम करत होता आज शनिवार असल्याने सुट्टी असल्या कारणाने यांनी आपल्या मित्रासोबत फिरायला जायचे नियोजन केले नासिर आपल्या तीन मित्र सोबत निमगाव शिवारातील ओढ्यात आले असता नासिर ला पाण्यात उतरण्याचे मोह अवरता आला नाही
कालच्या झालेल्या जास्त पावसामुळे ओढ्याच्या पाण्याची पातळी इतर दिवसात पेक्षा जास्त होती याचा अंदाज न आल्याने नासिर याचा बुडून मृत्यू झाला
यानंतर मृत्यू देह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले मात्र खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या हाती मृत्यू देह लागला नाही शिवरातिल दहा ते पंधरा तरुणांनी प्रयत्न केले असता तब्बल दोन ते अडीच तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला मृत्यू देह पूर्व तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले