मुंबई- एसआरपीएफच्या (SRPF) जवानाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली केल्याची धक्कादायक घटना आज रोजी मंत्रालयाजवळ घडली आहे.
मंत्रालयाजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या पुष्कर शिंदे या जवानाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून जीव संपवला आहे.सकाळी साडेनऊच्या सुमारास पुष्कर याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर डोंगरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
परिमंडळ १ कार्यक्षेत्रात मंत्रालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर स्ट्रायकिंग क्रमांक ३ ( एसआरपीएफ ग्रुप क्रमांक २, पुणे, डी कंपनी, प्लाटून क्रमांक १) तैनात करण्यात आली होती. आज मंत्रालय येथे रात्रपाळीनंतर जवान डोंगरी येथील महापालिकेच्या शाळेत आले होते. यावेळी पुष्कर सुधाकर शिंदे (वय ३६) यांनी ९.५० च्या सुमारास एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडून घेतली.
या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह जे.जे. रुग्णालयात नेला आहे. एसआरपीएफ तुकडी ६ जानेवारीपासून मंत्रालय परिसरात बंदोबस्तासाठी तैनात आहे.













