बीड – रात्रीच्या जेवणानंतर अचानक तब्येत बिघडल्याने चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यापैकी दोन बहिणीसह आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे घडली आहे. मात्र विषबाधा नेमकी कशातून झाली? हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार बागझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या दोन मुलींसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. घरात शिल्लक राहिलेले रात्रीचे जेवण केल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. साधना काशीनाथ धारासुरे , श्रावणी धारासुरे या दोघींचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले.
विषबाधा नेमकी कशामुळे झाली? याचा तपास पोलीस करत असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घडलेला प्रकार घातपाताचा तर नाही ना? असा संशयही व्यक्त होऊ लागला आहे.