धक्कादायक! भिंगार परिसरात घरगुती वादावरून पतीकडून पत्नीचा खून

420

अहमदनगर – दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात लोखंडी वॉल मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना भिंगार परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाधर नवनाथ लोंढे ( गणपती मंदिराजवळ, जामखेड रोड, ता. जि. नगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. मंदा सुनील वैराळ असे मयत महिलेचे नाव आहे. मंदा वैराळ यांचा पती आरोपी सुनील हिरामण वैराळ याला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली असून त्यालान्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

फिर्यादी गंगाधर लोंढे यांच्या घराच्या वरील मजल्यावर आरोपी सुनील वैराळ आणि मयत मंदा वैराळ त्यांच्या दोन मुली आणि एका मुलांसह भाडेकरू म्हणून वास्तव्यास होते. सोमवारी रात्री सव्वाअकराच्या दरम्यान आरोपी सुनील वैराळ याने घरगुती वादाच्या कारणातून मंदा वैराळ यांच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल मारून खून केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी सुनील वैराळ याला अटक केली आहे. कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here