नोएडा – उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे पैशांसाठी मित्राच्या बायकोची हत्या करणारा आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रामबीर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने मित्राच्या बायकोची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
नोएडा परिसरात 28 वर्षांचा रिक्षा चालक सुरेश (बदललेले नाव) तिच्या बायकोसह राहत होते. आरोपी रामबीर याला सुरेशने बायकोची हत्या केल्यास 70 हजार रुपये देईन अशी लालुच रामबीरला दिली. या कामासाठी दोन हजार रुपये ऍडव्हान्स देखील त्याने रामबीरला दिले.
20 जानेवारी रोजी सुरेश आणि रामबीरची पुन्हा भेट झाली. तेव्हा आधी रामबीरने सुपारी घ्यायला नकार दिला. त्यामुळे सुरेशने सुपारीची रक्कम वाढवून दीड लाख रुपये केली.
हत्येच्या दिवशी रामबीर सुरेशच्या घरी पोहोचला. त्याने बाहेरून दार ठोठावून आपण सुरेशचा मित्र असून त्याने पैसे पाठवल्याचं त्याच्या बायकोला सांगितलं. तिचा यावर विश्वास बसल्याने तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच रामबीरने तिच्या तोंडावर बुक्क्याने मारलं आणि तिच्या डोक्यावरही प्रहार केला. या हल्ल्याने पीडिता बेशुद्ध होऊन पडली. तेव्हा रामबीरने तिचं डोकं जमिनीवर वारंवार आपटायला सुरुवात केली. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. मृत्युनंतर रामबीरने तिच्या मृतदेहावर बलात्कार केला.
या प्रकरणी पोलिसांनी रामबीरला अटक केली. त्याची चौकशी करताना विजयने त्याला गुन्हा करण्यासाठी सुपारी दिल्याचं उघड झालं. आपल्या 22 वर्षांच्या बायकोची हत्या केल्याच्या आरोपावरून रेमशला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या मेहुणीशी लग्न करण्यासाठी बायकोच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं.