धक्कादायक! घरात घुसून सहा जणांनी केला तिघा भावांवर चाकूने हल्ला

305

श्रीरामपूर – राहाता तालुक्यातील जळगाव येथे घरात टीव्ही पहात असताना अचानकपणे सहा जणांनी घरात बळजबरीने प्रवेश करत चाकूने वार करत डोक्याला गावठी कट्टा लावत जिवे मारण्याची धमकी दिली. यात तिघेजण जखमी झाले. याप्रकरणी सहा जणांविरुध्द आला आहे. गुन्हा दाखल करण्यात

राहाता तालुक्यातील जळगाव येथे अशोक केरु वाणी व प्रकाश केरु वाणी, सुभाष केरु वाणी हे त्यांच्या ‘घरात टीव्ही पहात बसलेले असताना स्वयपाक खोलीच्या दरवाजातून अचानकपणे सहा अज्ञात आरोपी घरात घुसले. त्यांनी प्रकाश वाणी यांच्या हातावर चाकूने वार केला तर सुभाष वाणी याने प्रतिकार केला असता त्यालाही डोक्याला गावठी कट्टा ‘लावून गोळी घालण्याची धमकी दिली. लोखंडी हातोडीने मारहाण केली.

तसेच अशोक वाणी यांनाही बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत प्रकाश, अशोक व सुभाष हे तिघे सख्खे भाऊ जबर जखमी झाले.

या घटनेची माहिती कळताच श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अशोक केरु वाणी यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात सहा आरोपी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस सब इन्स्पेक्टर बोरसे हे आरोपींचा कसून शोध घेत आहेत. आरोपी हे चोरटे होते का गुन्हेगार हे समजू शकले नाही. त्यामुळे नेमकी चोरट्यांनीच मारहाण केली का? आणखी काही कारणातून तिघा भावांना मारहाण करण्यात आली याची चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here