धक्कादायक ! कॅटरिंगच्या कामावरून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

1127

मुंबई – कॅटरिंगच्या कामावरून घरी येताना एका अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोवंडी शिवाजी नगर परिसरात उघडीस आली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कॅटरिंगच्या कामावरून ही मुलगी घरी परतत येत होती. या वेळी या टोळक्याने त्या तरुणीला पकडले आणि बाजूला असलेल्या एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पळ काढला. मुलीने बाहेर येऊन आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांनी दहा पथके तयार केली असून आरोपींचा शोध घेत असून यासंदर्भात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अधिकमाहिती देत शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रकाने म्हणाले कीसकाळी साडेचारच्या दरम्यान, एक महिला रोड नंबर १३ येथील बस डेपोच्या जवळून जात असताना चार ओळखीचे लोक तिला भेटले होते. त्यातील एकाने काहीतरी बोलायचे आहे म्हणत एका खोलीत नेले. त्यानंतर बाकीचे तीन जण गेले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांची १० पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यातील दोन आरोपींना अटक केली असून दोघेही अल्पवयीन आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here