धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतील दोन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

673

राजस्थान – राजस्थानमधील डुंगरपूर येथे शाळेतील दोन मुलांनी त्याच शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला बेशुद्धावस्थेत तिच्या घरासमोर सोडून आरोपींनी पळ काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डेप्युटी एसपी राकेश कुमार शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, सामूहिक बलात्काराची तक्रार मंगळवारी बिछीवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. इयत्ता 9 वीच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच शाळेतील दोन मुलांनी अपहरण केल्याची घटना सोमवारी घडली होती . ते तिला जंगलात घेऊन गेले आणि त्यानंतर दोन्ही मुलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच घटनास्थळाचा तपास केला जाईल.

डेप्युटी एसपी पुढे म्हणाले की आरोपींचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे, मात्र पुढील तपासानंतरच त्यांना अटक केली जाईल. आरोपी मुलांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींची नावे व ठिकाणे समजली असली तरी पुढील तपासानंतरच त्यांना अटक करण्यात येईल. त्याचे ठिकाण माहीत आहे मात्र अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here