अहमदनगर- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती 16 फेब्रुवारी रोजी मिळाली होती.
या माहितीच्या आधारे संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील अधिकारी तसेच अंमलदार यांना माहितीमधील नमूद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी देवळाली प्रवरा येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला.
या कारवाईत बापू गायकवाड, सोमनाथ बर्डे, रमेश गायकवाड, आशाबाई बाळासाहेब गायकवाड, वैभव गायकवाड आणि ज्ञानेश्वर रामकिसन भागवत या आरोपींकडून एकूण 1 लाख 73 हजार 400 रुपयांचे मुद्देमाल जप्त करून सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे देवळाली प्रवरा परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे देवळाली प्रवरा येथील महिलांनी Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश औटी, H.c प्रभाकर शिरसाठ पो. कॉ. नितीन शिरसाठ, शशिकांत वाघमारे आदींनी केली.