*दिवाळी नंतर मराठवाड्यासह औरंगाबाद, जालना येथील मंत्र्यांचे घोटाळे उघडीस आणणार- किरीट सोमय्या.* किरीट सोमय्यांनी काही दिवसापूर्वी टि्वट करीत ठाकरे सरकारमधील ११ नेत्यांची यादी जाहीर करत भ्रष्टाचारचे आरोप केले होते. त्यानंतर या यादीत आणखी वाढ होणार असल्याचे संकेत सोमय्यांनी दिले होते. त्यांनी आता ठाकरे सरकारमधील एकूण ६ घोटाळे दिवाळीनंतर समोर आणणार असल्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे आरोप करतांना किरीट सोमय्या यांनी औरंगाबाद आणि जालना असा स्पष्ट उल्लेखच केला आहे. बीडचे धनंजय मुंडे, नांदेडचे अशोक चव्हाण, लातूरचे अमित देशमुख आणि संजय बनसोडे हे मराठवाड्यातील तर रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि दुसरे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दोघेही औरंगाबादचे तर आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्याचे आहेत. त्यामुळे सोमय्यांचा इशारा नेमका कुणाकडे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे._____________
- English News
- Conference call
- Crime
- Gas / Electricty
- Insurance
- Lawyer
- Peteol / Disel
- महाराष्ट्र
- अमरावती
- अहमदनगर
- उंब्रज
- कलकत्ता
- Education
- दिल्ली
- देश-विदेश











