Petrol-Diesel Price Today 9th February 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरिही देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर सलग 97 दिवसांपासून स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल (Crude Oil) च्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड 93 डॉलर प्रति बॅरल पार पोहोचलं आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत…
केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.