अहमदनगर – अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की 8 मार्च रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात कुलदीप सुदाम भिंगारदिवे ( रा. यशोदा नगर पाईपलाईन रोड) याने दिलेल्या फिर्यादीवरून कलम 307 आणि ॲट्रॉसिटी प्रमाणे जिशान शेख,अशोक शेळके आणि तमिम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे 7 मार्च रोजी जिशान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुलदीप सुदाम भिंगारदिवे याचा विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामूळे दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
सदर गुन्हा संपुर्ण खोटया स्वरुपाचा असावा यात कोणतीही शंका नाही. सदर गुन्हा हा एका जमिनीच्या वादातुन घडलेला आहे. त्याला विनाकारण जातीय स्वरूप देऊन कुठेतरी अॅट्रोसिटी अॅक्ट हा कायदा बदनाम करण्याचे काम झाले आहे. ज्या वेळेस खऱ्या स्वरुपाचा जातीय व्देषातुन अत्याचार होतो त्याच वेळेस अॅट्रोसिटीप्रमाणे गुन्हा दाखल होत नाही म्हणून खोटया स्वरुपाच्या अॅट्रोसिटी थांबून ज्याच्यांवर खरच अत्याचार होतो त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.
सदर प्रकरण आपण गार्भियाने घेऊन या गुन्हयाचा तपास तसेच सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा ही या निवेदनातून देण्यात आला आहे.