मुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. तर कधी आपल्या बोल्ड फोटोमुळे ती सोशल मीडियावर चर्चात असते मात्र आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. यावेळी तिने मध्यप्रदेशमध्ये एका कार्यक्रमात “माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे” असे वादग्रस्त विधान केला आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
त्याच्या या विधानावरून मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश पोलिसांना देत २४ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणावर तत्यांनी म्हटले आहे कि मी हे वक्तव्य ऐकलं आणि पाहिलं असून त्याचा निषेध करतो असं सांगितलं. ते म्हणाले की, मी भोपाळच्या पोलीस आयुक्तांना याप्रकरणाची चौकशी करत २४ तासात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ.
भोपाळमध्ये श्वेता तिवारीने आपल्या बेव सीरिज ‘शो स्टॉपर’च्या प्रमोशनसाठी आली होती. तेव्हा तिने माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे असं म्हटलं. त्यानंतर तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक यूजर तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे आता तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दोन लग्न आणि घटस्फोटामुळे श्वेताचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं आहे. १९९८ सालामध्ये श्वेता तिवारीने अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केलं होतं. त्यांना पलक ही मुलगी आहे. तर २००७मध्ये श्वेता आणि राजा विभक्त झाले. राजा चौधरीवर श्वेता तिवारीने हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर श्वेताने २०१३ सालामध्ये अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. श्वेता आणि अभिनवला रेयांश नावाचा मुलगा आहे. तर अभिनवदेखील हिंसाचार करत असून छळ करत असल्याचा आरोप श्वेताने केला होता. त्यानंतर २०१९ सालामध्ये श्वेताने अभिनवला घटस्फोट दिला.











