‘त्या’ प्रकरणात ममता बॅनर्जीने केला शरद पवारांना फोन; दिला पाठिंबा

1123

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज दुपारी तीन वाजता ईडीने तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे.जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलून आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.

पहाटे पाचच्या सुमारास ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता.

तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी 24 फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here