मुंबई – मुंबई पोलीसचे माजी आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना चांदीवाल आयोगाने समन्स बजावले असून नवाब मलिक यांना 17 फेब्रुवारी रोजी आयोगा समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वी अँटिलिया प्रकरणामागे सचिन वाझे आणि परमबीर सिंह असल्याचे वक्तव्य केले होते त्यानंतर सचिन वाझेने यांनी मलिक यांनी केलेल्या वक्तृत्वामुळे आपली प्रतिमा खराब होत असल्याच्या म्हटले होते. त्यानंतर आता चांदीवाल आयोगाकडून मलिकांकडे विचारणा करण्यात येणार आहे.
अशा वक्तव्यामुळे प्रतिमा खराब होत आहे असा आरोप सचिन वाझेने केला आहे. त्यामुळे आयोगाने त्यांना समन्स बजावून चौकशी करावी. त्यामुळे ते कोणत्या आधारावर आरोप करत आहे हे स्पष्ट होईल अशी मागणी सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर केली आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीजवळ एका गाडीमध्ये स्फोटके सापडली होती. गाडीमध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे एक पत्र सापडले होते. त्यानंतर 05 मार्च रोजी या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. अँटिलिया स्फोटकेप्रकरणात मुंबई पोलिसातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचेही नाव आहे.