‘त्या’ प्रकरणात अॅट्रॉसिटी गुन्ह्यातून अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता

424

शिर्डी- कोपरगाव तालुक्यातील सडे येथील अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीनंतर दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यातून अकरा आरोपींची कोपरगाव जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सदरच्या खटल्यात ॲड. शंतनु धोर्डे यांचा युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला आहे.

याबाबत माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील सडे येथील भाऊसाहेब रामचंद्र बारहाते व इतर १० आरोपीविरुद्ध दि. २२ मार्च २०१७ रोजी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम १४३, १४७, १४८, ४५२, ३५४ अ, ५०४, ५०६, १४९ व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कलम ३ (१) (आर) (एस) (डब्ल्यू) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले. त्याप्रमाणे कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात सदर अॅट्रॉसिटी खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात सडे येथील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, नोकर यांना आरोपी करण्यात आले होते. दरम्यान रामचंद्र बारहाते सडे गावातील इतर बारहाते कुटुंबीय अजित जयराम कोताडे यांची अॅट्रॉसिटीच्या खटल्यातून मुक्तता केली. त्यांचेविरूध्द कोणत्या कलमांतर्गत गुन्हा सरकारी पक्षाने शाबीत केलेला नाही. त्यानंतर सदरचा खटला चालवून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असल्याचे अँड शंतनू धोर्डे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here