मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह उल्लेख केला होता. त्यानंतर विरोधकांनी नाना पटोले यांच्यावर चारी बाजूने टीका केली होती. त्यातच विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करत नाना पटोले यांच्यावर टीका केली होती.
या ट्विट मध्ये अमृता फडणवीस यांच्याकडून नाना पटोले यांचा उल्लेख नन्हे पटोले असा करण्यात आला होता. याच टीकेला आता नाना पटोले यांनी उत्तर दिला आहे. ते एका प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा तर दिला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये अमृता फ़डणवीस म्हणतात की “थोडक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स ; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है नामर्द है !
नाना पटोलेंना जेव्हा अमृता फडणवीसांकडून तुमचा उल्लेख ‘नन्हे पटोले’ केला जात आहे यासंबंधी विचारण्यात आलं तेव्हा त्यांना अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काहीचं बोलत नाही असं सांगितलं.
दरम्यान अमृता फडणवीसांच्या ट्वीटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी पातळी सोडून बोलत असल्याची तक्रार केली आहे. तर आपण टोकाची राजकीय टिपण्णी करून जनतेचा रोष ओढवून घेऊ नये, समाजोपयोगी कामं करत राहा, राजकीय टिपण्णी करू नये असा सल्लाही काही जणांनी दिली आहे.