तो’ लग्न करणार होता, वाद झाल्यानंतर भिंतीवर डोके आपटून केली महिलेची हत्या…

तो’ लग्न करणार होता, वाद झाल्यानंतर भिंतीवर डोके आपटून केली महिलेची हत्या

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका महिलेची भिंतीवर डोके आपटून हत्या करण्यात आली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. त्याच्या शोधासाठी विठ्ठलवाडी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकन्या आव्हाड असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सुकन्या हिच्या पतीचे सात वर्षांपूर्वीच निधन झाले. ती मुलांसोबत चिंचपाडा परिसरात राहत होती. काही दिवसांपासून सुकन्याची अनिल भातसोडे याच्यासोबत ओळख वाढली. दोघे लग्नही करणार होते. अनिलचे तिच्या घरी येणे-जाणेही वाढले होते. अनिल हा वारंवार सुकन्याकडे पैशांची मागणी करत असे. यातून दोघांमध्ये वाद होत होते. १२ मार्च रोजी अनिल आणि सुकन्या यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यावेळी अनिलने सुकन्याला बेदम मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आपटले. हा सगळा प्रकार सुकन्याच्या मुलीने बघितला. ती घराबाहेर मोबाइलमध्ये व्हिडिओ गेम खेळत असताना, तिला घरातून सुकन्याच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा घरात डोकावून पाहिले असता, अनिल हा तिच्या आईचे डोके भिंतीवर आपटत होता. यात सुकन्या गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अनिल फरार झाला. आता सुकन्याच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी अनिल भातसोडे याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here