ते दुकान एमआयएम फोडणार जलील यांचा राज्य सरकारला इशारा

445

मुंबई – ठाकरे सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीच्या निर्णय घेतला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील राज्य सरकारवर टिका करत गंभीर इशारा दिला आहे.

भाजप, काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे आम्ही केवळ टीका करणार नाही. माझ्या औरंगाबाद मतदारसंघात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी किराणा दुकानातून वाईन विक्रीचे उद्घाटन करुन दाखवावे. त्यांच्या पुढे एमआयएम ते दुकान फोडून टाकेल.ज्या दुकानासमोर वाईनचे डिस्प्ले झळकतील, तेही फोडून टाकले जाईल अशा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.

जलील म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांचा खरोखरच विकास करायचा असेल तर इतरही उपक्रम राबविता येईल. दुधाची विक्री शेतमालास चांगले भाव देणे, यासह अनेक मार्ग आहेत. वाईन हा एकमेव पर्याय नाही. अगोदरच दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. होत आहेत. त्यात वाईनची बाटली तरुणाच्या हातात देऊन राज्यातील महाविकास आघाडी त्यांनी दारु पिण्याची शिकवण देऊ इच्छित आहे का? आज वाईन पिणारा तरुण उद्या बियर, रम, व्हिस्की घेणार. तरुणांना व्यसनमुक्त ठेवण्याऐवजी हे सरकार व्यसनाधीन करण्याच्या प्रयत्नात आहे का असा असा सवालही त्‍यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here