*ठळक बातम्या*
*१)एनसीबीनं केलेल्या सर्व कारवायांची न्यायिक चौकशी करा*नवाब मलिक यांनी वर्षभरातील एनसीबीनं केलेल्या सर्व कारवायांची न्यायिक चौकशी करण्यात यावी, त्यामधून सत्य बाहेर येईल, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केलीय*२)शेअर बाजारात मोठी घसरण*शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 456 अंकांनी तर निफ्टी 152 अंकावर झाला बंद व्यवहार संपल्यावर BSE सेन्सेक्स 456.09 अंकांनी किंवा 0.74 टक्क्यांनी घसरून 61259.96 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE निफ्टी 152.15 अंक किंवा 0.83 टक्के घसरून 18,266.60 वर बंद झाला.*३)परदेशी प्रवाशी नागरिकांना Negative RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य*भारतामध्ये येणार्या परदेशी प्रवाशी नागरिकांना Negative RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य भारतामध्ये येणार्या परदेशी नागरिकांना Negative RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. *४)सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देणार यंदा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या टर्म 1 च्या परीक्षा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहेत. त्याचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आलं आहे.