ठळक बातम्या
समीर वानखेडे आणि जास्मीन वानखेडे यांच्यावर मलिकांचे गंभीर आरोप
समीर वानखेडे आणि जास्मीन वानखेडे यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली. कोरोना काळात फिल्म इंडस्ट्रीतील लोक दुबई, मालदीवला होते, तिकडे जाऊन वसुली केल्याचा आरोप
3 महिन्याच्या आत केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुसरी महागाई भत्ता वाढ
एकाच वर्षात 14 टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. जुलै महिन्यात केंद्र सरकारने 11 टक्के महागाई भत्ता वाढवला होता आता अजून 3 टक्के वाढवला. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांपर्यंत पोहोचला
ममता बॅनर्जी 28 ऑक्टोबरला गोवा दौरा करणार
बंगाल निकालानंतर ममतांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत.बंगाल बाहेर विस्ताराचे वेधही सुरू आहेत.. एक शेजारचं त्रिपुरा, दुसरं गोवा या राज्यात ममता पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत.
बॉलिवूडचे दोन चित्रपट ऑस्करसाठी नामांकित
पुढील वर्षी 27 मार्च 2022 रोजी 94 वे अकादमी पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी भारतीय चित्रपटातील अनेक चित्रपट ऑस्करसाठी नामांकित केले जातात. यावेळी विद्या बालन स्टारर ‘शेरनी’आणि विकी कौशल स्टारर ‘उधम सिंह’ चित्रपट ‘ऑस्कर 2022’ साठी नामांकित झाला आहे.











