cooking
टक्कर वडा
कृती:
बटाटा उकडून घेणे
रताळे उकडून घेणे
बटाटा, रताळ्याचे प्रमाण 2:1
उकडलेल्या बटाटा, रताळे सोलून स्मँशरने स्मँश करून घेणे, शिंगाड्याचे पीठ, साबूदाण्याचे पीठ बायडिंग साठी(प्रत्येकी 2-3 चमचे), चवीनुसार पिठीसाखर(जाड साखर नाही),मीठ घालून छान मळून घेऊन बाजूला ठेवा.
खोवलेला नारळ हिरवी मिरची मीठ व लिंबूरस घालून मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यावी. वाटलेली चटणी वरील मळलेल्या गोळ्या मघ्ये घालून मळून घ्यावा.
बटाट्याच्या लगद्यापासून गोळे तयार करून हाताला तूप लावून पारी करून त्यात हलक्या हाताने ड्रायफ्रूटचे काप (अगदी थोडेसे) घालून व्यवस्थित बंद करून वडा हलकेच दाबून चप्पट करून घ्या.
तयार वडे नाँनस्टीक पँनमद्ये (झाकून) तूप घालून शँलो फ्राय करावे. दोन्ही बाजूने मस्त लालसर रंग येऊ द्यावा.
फ्राय झालेले वडे ताकाबरोबर खाण्यासाठी द्या
द्वारा
शितल बेद्रे
आँटो 01, 2020 रोजी