मुंबई – राहुरी चे आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी ईडने कारवाई करून त्यांची काही मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड टिका करत एक सूचक इशारा दिला आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असे दिसत आहे. जेव्हा द्वेषबुद्धीचे राजकारण सुरु होते, तेव्हा त्याची फळे कालांतराने भोगावी लागतात. असं सूचक इशारा त्यांनी ईडसह भाजपाला दिला आहे.
तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना तिथून तत्काळ देशात आणण्याऐवजी भाजपचे मंत्री आता विद्यार्थ्यांनाच दोष देत आहेत. भाजपला माणुसकी, मन, आई-वडिल यांचे दुःख समजत नाही. जेव्हा युद्धाचे ढग जमू लागले तेव्हाच विद्यार्थ्यांना आणण्याचे काम करायला हवे होते. मात्र जेव्हा बॉम्ब पडायला लागले तेव्हा दिवसाला २५० विद्यार्थी आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला.
दिवसाला २५० विद्यार्थी आणले तर २० हजार विद्यार्थी आणायला किती दिवस लागतील? याचाही विचार झाला पाहीजे, असे आव्हाड म्हणाले. भारताने याआधी कुवैत, लिबिया युद्धाच्या वेळी काही लाख माणसांना कमी वेळेत मायदेशी परत आणले होते. आज युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण होत आहे, केंद्र सरकारची यावर भूमिका स्पष्ट नाही, अशी टीका देखील आव्हाड यांनी केली.