जुगार अड्ड्यावर छापा.., गुन्हा दाखल, कोतवाली पोलिसांची कारवाई

333

अहमदनगर – कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोतवाली पोलिसांनी केडगाव उपनगरात ही कारवाई केली. कृष्णा दत्तात्रय डहाळे (वय ३८ रा. केडगाव) व हरिष बापुराव सावेकर (वय ६२ रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

केडगाव उपनगरात दोन ठिकाणी कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. कृष्णा डहाळे हा केडगाव कांदा मार्केट रोडवरील हॉटेल पंचमीच्या आडोशाला जुगार अड्डा चालवित होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य जप्त केले.

पोलीस अंमलदार सोमनाथ राऊत यांच्या. फिर्यादीवरून डहाळेविरूध्द गुन्हा, दाखल केला आहे. दुसरा छापा, केडगाव उपनगरातील रंगोली हॉटेलच्या पाठीमागे टाकला. तेथे हरिष सावेकर हा कल्याण मटका जुगार चालवित होता. त्याला पथकाने पकडून त्यांच्याकडील रोख रक्कम, साहित्य जप्त केले आहे. पोलीस अंमलदार दीपक रोहकले यांच्या फिर्यादीवरून हरिष सावेकरविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here