जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणाऱ्या ‘त्या’ टोळी विरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई

427

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हे रोखण्यासाठी जिल्ह्यात असलेल्या विविध गुन्हेगारांची माहिती संकलित करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत त्यांचे विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत काही दिवसापूर्वी दिले होते.

त्या अनुशंगाने 22 ऑक्टोंबर 2021 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्हाचा तपास करत असताना हा गुन्हा गुन्हा सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भाणुदास कुन्हाडे व त्यांचे टोळीने संघटीतपणे केल्याचे समोर आले होते.

सदर टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहह्याक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी (मोक्का) प्रस्ताव पोलीस उपमहानिरीक्षक बी जी शेखर यांचेकडे पुर्व मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.हा प्रस्तावास १९ जानेवारीला मंजूर झाला.

त्यानुसार सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भाणुदास कुन्हाडे (टोळीप्रमुख) ,राहुल सुरेश जाधव, पंकज बापु गायकवाड ,आकाश रामचंद्र भोकरे, सांगर गोरख मांजरे सतिष मच्छिद्र शिंदे, अमोल सटवा कापसे, विक्की उर्फ विकास शिंदे, विकास अशोक जाधव या आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या आरोपींविरोधात प्रामुख्याने एमआयडीसी, कोपरगाव, श्रीरामपूर, तोफखाना, लोणी पोलीस स्टेशन तसेच नाशिक जिल्हयातील गंगापूर, उपनगर पो.स्टे. सातपुर पो.स्टे. नाशिक रोड पो.स्टे. हद्दीत गंभिर स्वरुपाचे संघटीतपणे मालाविरुद्ध व शरिराविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे ज्यामध्ये दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, दरोडयाची तयारी करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, फसवणुक करुन दरोडा टाकणे अशा स्वरुपाचे गुन्हे कट करुन स्वत:चे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करण्याचे आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here