अहमदनगर – बेकायदेशिररित्या गावठी कट्टे व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. किशोर बाळासाहेब खामकर, किशोर साईनाथ शिंगारे आणि अभय अशोक काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ४ गावठी कट्टे व १२ जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितनुसार किशोर खामकर आणि किशोर शिंगारे हे दोघे राहुरी फॅक्टरी येथे मोटारसायकलवरुन येताना पोलिसांना दिसले तेव्हा पोलिसांनी संशयित म्हणून त्यांची विचारणा करून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून २ गावठी कट्टे व ६ जिवंत काडतुसे व १ मोटारसायकल असा १ लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. तसेच अभय अशोक काळे यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे असा ५१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील सागर रोहिदास मोहिते हा आरोपी पसार झाला.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्वाती भोर, अजित पाटील, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि. अनिल कटके, सोपान गोरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, भाऊसाहेब फोलाने, भिमराज खर्से, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रविकिसन सोनटक्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.









