जिल्ह्यात डायल 112 प्रणालीमुळे पोलिसांनी वाचवले एकाचे प्राण

319

अहमदनगर – नागरिकांना आपतकाली परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यामुळे सुरु करण्यात आलेल्या अहमदनगर जिल्ह्यात कार्यारत डायल 112 प्रणाली मुळे एका सामान्य नागरिकाचे प्राण वाचविण्यात सुपा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना यश आले आहे .

अहमदनगर जिल्ह्यात वारंवार मारहाण ,भांडण, तंटा यांसारख्या घटना घडत असतात . त्यावर तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी जावुन पिडितांना मदत मिळवून देता येते . त्याबाबत पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर यांचे आदेशान्वये जिल्ह्यात सुरु असलेल्या डायल 112 प्रणाली मुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थित मदत मिळते व पुढील घटनांना आळा घालता येतो .

03 फेब्रुवारी रोजी 01 च्या सुमारास डायल 112 प्रणालीवर गंगाराम रामदास ढगे (रा . रांजणगाव मशीद ता . पारनेर) यांनी त्यांचे फोनवरुन फोनकरुन कळविले की मी आता माझे शेतात असुन माझे आयुष्याला कंटाळलो आहे व शेतातील झाडाला फाशी घेत आहे असे फोनवर सांगत असल्याने तात्काळ सुपा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार घटनाठिकाणी गेले असता गंगाराम रामदास ढगे यांस ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला घेवुन आले .

त्यानंतर त्यांचे नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलावुन घेवुन पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी त्यांचे नातेवाईकांसमक्ष गंगाराम रामदास ढगे यांची योग्य प्रकारे समोपदेशन करुन त्यांना आत्महत्ये पासुन परावृत्त करण्यात आले आहे . त्यावरुन गंगाराम रामदास ढगे यांनी पोलीसांचे आभार मानले

तसेच पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी याद्वारे जनतेस देखील आवाहन केले आहे की , अशाप्रकारचे कोणतेही टोकाचे पाऊल न उचलु नये . तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीसांचेवतीने सुरु करण्यात आलेल्या डायल 112 प्रणालीशी संपर्क साधावा ज्यामुळे सामान्य जनतेस योग्य वेळेत मदत पोहचवता येईल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here