अहमदनगर: जिल्ह्यात आज 547 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 83 हजार 921 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.70 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 231 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1824 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 41 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 167 आणि अँटीजेन चाचणीत 23 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 13, अकोले 03, नेवासा 01, पारनेर 02, पाथर्डी 06, राहुरी 02, संगमनेर 02, शेवगांव 05, श्रीरामपूर 02, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 02 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 37, अकोले 01, कर्जत 02, कोपरगांव 54, नगर ग्रा. 11, नेवासा 05, पारनेर 08, पाथर्डी 02, राहाता 29, राहुरी 07, शेवगांव 02, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 04 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 23 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 05, नगर ग्रा. 02, नेवासा 01, पारनेर 01, पाथर्डी 02, राहाता 01, राहुरी 01, संगमनेर 01, शेवगांव 02, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 02, कॅन्टोनमेंट बोर्ड 03 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 100, अकोले 17, जामखेड 08, कर्जत 07, कोपरगाव 47, नगर ग्रा 23, नेवासा 16, पारनेर 13, पाथर्डी 16, राहाता 187, राहुरी 15, संगमनेर 16, शेवगांव 12, श्रीगोंदा 24, श्रीरामपूर 23, कॅन्टोनमेंट बोर्ड 05, इतर जिल्हा 12 आणि इतर राज्य 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.