अहमदनगर – सलग दुसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यात कोरोनाबधित रूग्ण संख्यात कमी पाहिला मिळाली आहे.
जिल्ह्यात आज 600 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 03 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात 804 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
आज नोंद झालेल्या 600 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 169, नगर ग्रामीण भाग 41, जामखेड 40 ,पारनेर 34, राहुरी 34 ,श्रीगोंदा 34, कोपरगाव 30, अकोले 29, राहता 28, श्रीरामपूर 26,शेवगाव 23, पाथर्डी 22, नेवासा 20, इतर जिल्ह्यातील 18, भिंगार कँटोन्मेंट 17, कर्जत 16, संगमनेर 10, मिलिटरी हॉस्पिटल 08 आणि इतर जिल्ह्यातील 01 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 93, खाजगी लॅबमध्ये 160 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 347 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.










