जिल्ह्यातील देवस्थानांनी स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील सादर करण्याचे आदेश

368

अहमदनगर – जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत देवस्थानांनी त्यांच्या न्यासाची कोरोना महामारी पूर्वीच्या तसेच सद्याच्या स्थावर व जंगम मालमत्ते बाबतचा सविस्तर तपशीलासह 28 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे येथे बेठकीस उपस्थित रहावे. असे आवाहन पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त सुधीर बुक्के यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे केले आहे.या बैठकीत ‘कोरोना महामारी नंतरची देवस्थानाची वाटचाल’ या विषयावर आढावा घेतला जाणार आहे.

गेल्यावर्षी अचानकपणे उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे या कार्यालयातील नोंदणीकृत असलेल्या अनेक देवस्थानांचे निरीक्षण घेणे या विभागातील निरीक्षकांना शक्य न झाल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. या कालावधीत बहुतांशी न्यासाच्या स्थावर तसेच जंगम मालमत्तेमध्ये थोड्या-फार प्रमाणात बदल झाला आहे.

न्यासाचे अध्यक्ष/सचिव/विश्वस्त यांनी भाडे करारावर दिलेल्या वा अतिक्रमित वा भूसंपादित झालेल्या न्यासाच्या मालकीच्या जागेच्या तपशील व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह बैठकीस स्वतः हजर राहावे. या बैठकीस उपस्थित राहून माहिती सादर न केल्यास होणाऱ्या पुढील कायदेशीर परिणामांची जबाबदारी देवस्थानाचे अध्यक्ष/सचिव/विश्वस्त यांची राहील. याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी. असे आवाहन ही धर्मादाय सह आयुक्त श्री.सुधीर बुक्के यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here