जायकवाडी जलाशयातून ९४३२० क्यूसेक विसर्ग ; वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सुरू
बोधेगाव, दि १८- जायकवाडी धरणामधून आज शुक्रवार दि १८ रोजी सकाळी ठीक ३.३० ते ४ वाजता दरम्यान मुख्य गेट्स क्र.१,९,५,३,७,२,८,४,६,असे एकुण ९ गेट दीड फुट उंचीवरुन २ फूट उंचीवर उघडण्यात आले आहे तसेच ४७१६ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात वाढविण्यात आला आहे.
जलाशयाचे ४ फुटाने उघडण्यात आलेल्या गेट पुढीलप्रमाणे क्रमांक
१०,२७,१८,१९,१६,२१,१४,२३,१२,२५,११,२६,१३,२४,१५,२२,१७,२०,तर दोन फुटाने उघडण्यात आलेल्या गेट क्रमांक १,९,५,३,७,२,८,४,६ (आपत्कालीन व्दार) सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यातून ८९६०४ तसेच ४८१६ = एकूण ९४३२० क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. गोदावरी पात्रालगत ग्रामस्थांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आहवान प्रशासनाने केले आहे.