जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदच्या वतीने आरोग्य सेवा उपक्रम

437

अहमदनगर – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च ते ८ एप्रिल २०२२ या कालावधीत आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत महिलांच्या विविध आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या उपक्रमात असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व महिलांची आरोग्य तपासाणी करण्याकरीता विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थामध्ये असंसर्गजन्य आजारांकरीता उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तनाचा कॅन्सर, मुखाचा कॅन्सर, गर्भाशय पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, हिमोग्लोबिन आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आजाराबाबत समुपदेशनही करण्यात येणार आहे.

महिलांनी या आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग घेऊन आपली तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. या मोहीमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य समितीचे सभापती प्रताप पाटील शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) संदिप कोहीणकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी मार्गदर्शन केले आहे.असे ही डॉ. संदीप सांगळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here