मुंबई – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज तीस हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
तर दुसरीकडे मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णालयात कोरोना उपचारांसाठी दाखल झालेल्या 21 वर्षीय तरुण उपचार अर्धवट सोडून कचऱ्या मधील पीपीटी किट घालून पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना समोर येताच रुग्णालयात एकच धावपळ सुरु झाली . त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती पोलिसांनी या तरुणाला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून अटक केली आहे.
या 21 वर्षीय तरुणाला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी या तरुणाने कचऱ्यात पडलेला पीपीई किट घालत रुग्णालयातून पळ काढला. यानंतर एमआरए पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसंच त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून त्याला अटक कऱण्यात आली. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक केली आहे.










