घसादुखी, आवाज बसण्यावर घरगुती उपाय
आजकाल हवामानही इतक्या अचानकपणे बदलतय गार हवामानामुळे घसा खराब होण्याच प्रमाण ही वाढत आहे. या अश्या वातावरणामुळे सर्दी किंवा खोकला होऊन घशाला आतून सूज येते, व घसा दुखू लागतो. या घसादुखीपासून आराम मिळविण्या करता हे काही उपाय घरच्याघरी करता येतील.
पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या. गरम पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालून गुळण्या कराव्यात. या साठी एक ग्लास गरम पाण्यामध्ये लहान चमचा मीठ घालून त्याने गुळण्या कराव्यात. असे दिवसातून तीन ते चार वेळा करावे असे केल्याने आराम मिळेल.
इलायची आणि खडी साखर एकत्र चघळा असे केल्याने घसा मोकळा होईल. गरम दुधामध्ये हळद घालून ह्या दुधाचे सेवन केल्याने ही घशाला आराम मिळतो. ही पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
हळद अँटी बायोटिक असल्याने घशातील इन्फेक्शन कमी होऊन सूजही कमी होण्यास हळद मदत करते. त्यामुळे गरम दुधामध्ये हळद घालून त्याचे सेवन करा. मधात काही लवंगा टाका.काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा.लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल. लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.
घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा. त्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल. आल, वेलची आणि काळी मिरी एकत्र करून चहा बनून प्या आणि दिवसातून दोन वेळा तरी या चहाचे सेवन केलेत तर आपल्याला खूप आराम मिळेल. त्याच बरोबर यात जीवाणूरोधक गुण असतात. हा चहा पिल्याने आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ही वाढेल.
असे हे उपाय घरातल्या घरी केल्याने तुम्ही स्वतःला घसादुखी, आवाज बसण्यापासून दूर ठेवू शकता.