अहमदनगर – कोतवाली पोलिसांनी कारवाई करत अहमदनगर शहरातील पंचपीर चावडी कबाड गल्ली येथे गोमास विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकत दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच या कारवाईत 9 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पंचपीरचावडी , कबाड गल्ली येथे महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी असताना ही स्वतःचे कब्जात गोवंशीय जनावराचे मांस बाळगुण त्याची विक्री करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फतकोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करून त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकुन कारवाई करा असा आदेश दिल्याने पोलीस नाईक योगेश कवाष्टे, पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे,पोलीस नाईक अभय रामचंद्र कदम, पोलीस नाईक अमोल गाडे पोलीस कॉन्स्टेबल शाहिद शेख, पोलीस नाईक दिपक रोहकले,पोलीस नाईक संतोष गोमसाळे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे,पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत यांच्या पथकाने बातमीच्या ठिकाणी जाणून मुजाहीज ऊर्फ मज्जु मुस्ताक शेख आणि अदनान फारुख कुरेशी यास अटक केली.
त्यांच्याकडून ९ हजार ६५० रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या जवळून मिळून आलेल्या मांसाची विल्हेवाट लावणे कामी आयुक्त सो , महानगरपालिका , अ.नगर यांना लेखी पत्र दिलेले असुन सदर ठिकाणी मिळुन आलेल्या मांसाची योग्यरित्या विल्हेवाट होणे करीता ते आरोग्य विभाग , महानगरपालिकेचे कर्मचारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. तर आज १० मार्च रोजी महाराष्ट्रा राज्यमध्ये गोवंशीय हत्याबंदी असतानाही आपले कब्जात ताब्यात ठेवून त्याची विक्री करीत असताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल दिलीप गाडे यांनी भा.द.वि. कलम २६ ९ सह महाराष्ट्र प्राणी रक्षण ( सुधारण ) अधिनीयम सन १ ९९ ५ चे कलम ५ ( क ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक योगेश कवाष्टे हे करत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी, अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलीस नाईक योगेश कवाष्टे, पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे,पोलीस नाईक अभय रामचंद्र कदम, पोलीस नाईक अमोल गाडे पोलीस कॉन्स्टेबल शाहिद शेख, पोलीस नाईक दिपक रोहकले,पोलीस नाईक संतोष गोमसाळे,पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.