गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ,साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ,साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता

गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलीसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरात सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातारा पोलिसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात 9 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.दरम्यान, पुण्यातील कात्रज परिसरात राहणारे अमर रामचंद्र पवार (वय 35) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

अमर पवार हे बांधकाम व्यावसायिक असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. सदावर्ते यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशजांचा एकेरी उल्लेख करुन सकल मराठा समाजाचा अपमान होईल व जाती-पाती मधे तेढ निर्माण होऊन दंगल भडकेल अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलीसही या गुन्ह्यात सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

सध्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे आहे. काल मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला होता.

संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं होतं. काल रात्री उशिरा त्यांना सातारा येथे आणलं गेलं.

त्यांना सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात आलं. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here