अहमदनगर – अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात दोन इसम राज्यात बंदी असलेला गुटखा व सुगंधीत सुपारीजन्य पदार्थ विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना मिळाली होती.
या बातमीवरून सदर ठिकाणी जाऊन पोसई गजेंद्र इंगळे, व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी पंचासमक्ष छापा टाकला असता त्यांच्याकडून गोवा गुटखा सुगंधी सुपारी आढळून आल्याने त्यांना सदर इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता राकेशकुमारा जगदंबप्रसाद मिश्रा (वय ४२ वर्ष रा MIDC अ.नगर) ,अभिजित गोवींद लाटे (वय ३४ वर्ष रा पाईपलाईन रोड) असल्याचा समोर आले. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या गोवा गुटखाबाबत चौकशी केली असता त्यांनी MIDC येथे गुटख्याचे गोडाऊन असुन तेथुनच सगळा माल विक्री करीता वितरीत केला जातो असे सांगितल्याने पोलिसांनी MIDC बोल्हेगाव परिसरात राहणारे रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे यांच्या एका पत्र्याचे शेडमध्ये पंचासमक्ष छापा टाकला असता त्याठिकाणी राहुल कैलासनाथ सिंग, अझर शकील शेख, चंद्रकेश शोभनाथ तिवारी, शिवप्रकाश रामकुमार तिवारी, मोहसिन शब्बीर पटेल, अर्जुन शंकर यादव, नितीन सुनिल साठे आणि शादाब शब्बीर पटेल गुटख्याचे पाकीटे मोजताना मिळुन आल्याने त्यांना जागीच ताब्यात घेतले आहे. तर शेडचे मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे (फरार) झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
१) ९७,९३,९२० /- रु किं चा गोवा गुटखा व विविध कंपनीचा गुटखा
२) ३,६२,८००/- रु किं ची विविध कंपनीची सुगंधीत तंबाखु
३) २,३५,००० /- रु किं चे विविध कंपनीचे मोबाईल
४) २,००,०००/- रु किं च्या ०४ मोपेड दुचाकी गाड्या
५) ३२,०००/- रु रोख रक्कम
१,०६,२३,७२० /- रु किंमतीचा एकुण जप्त मुद्देमाल (एक कोटी सहा लाख तेवीस हजार सातशे विस रुपये मात्र) असा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.
मुद्देमालासह आरोपी मिळुन आल्याने त्याना ताब्यात घेवुन आरोपींना अटक करण्यात आली आहे व त्याचे विरोधात पोना योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३२८,२७३,२७२,१८८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पुढील तपास हा पोसई गजेंद्र इंगळे हे करीत आहेत.