गावठी कट्टयातून फायर करणारा आरोपी २४ तासात पकडला ; एलसीबीची धडकेबाज कारवाई करणारा
अहमदनगर- सोनई परिसरात गावठी कट्टयातून फायर करुन खूनाचा प्रयत्न करणारा सराईत आरोपी २४ तासाच्या आत पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व शेवगांव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोसई सोपान गोरे, सफौ विष्णु घोडेचोरे, भाऊसाहेब मुळीक, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदिप पवार, संदिप घोडके, पोना ज्ञानेश्वर शिंदे, संदिप दरदंले, शंकर चौधरी, सचिन आडबल, संतोष लोढे, संदिप चव्हाण, सुरेश माळी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, लक्ष्मण खोकले, पोकॉ शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, योगेश सातपुते व चापोहेकॉ उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.२३ एप्रिल २०२२ रोजी आरोपी नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा) व संतोष भिंगारदिवे (रा. घोडेगांव, ता. नेवासा) यांनी आरोपी ऋषीकेश वसंत शेटे (रा. सोनई, ता. नेवासा) याच्या सांगणेवरुन मागील जुने भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फायरींग करुन जबरी जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, या विकास जनार्धन काळे (वय २७, रा. लोहगांव, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२३ / २०२२ भादविक ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४७, १४८, ९४९ सह आर्म अॅक्ट ३/२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) /१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना तातडीने या घटनेतील आरोपींवर कारवाई व्हावी, अशा सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यासह, मुंबई व पुणे या ठिकाणी तपासा करीता तीन वेगवेगळी तपास पथके आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. दरम्यान पोनि श्री. कटके यांना फायरींग करणारा आरोपी नितीन शिरसाठ हा शेवगांव बस स्टॅण्ड परिसरात येणार आहे.
तो बाहेरगांवी पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीनुसार पथकाने शेवगांव बस स्टॅण्ड परिसरात सापळा लावून थांबले. यावेळी एकजण संशयीतरित्या फिरतांना दिसला, त्याची खात्री होताच त्याला पकडण्याच्या तयारीत असतांना आरोपीस पोलीस पथकाची चाहुल लागताच तो पळून जावू लागला, त्याचक्षणी पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केल्यावर त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिस खाक्या दाखविताच आरोपी याने सोनई पोस्टे गु.र.नं. १२३/२२ भादविक ३०७, ३२३, ५०४ वगैरे सह आर्म अॅक्ट ३/२५ व मपोकाक ३७ (१) (३)/१३५ हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन सोनई पोलिस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास सोनई पोलीस करीत आहे.











