अहमदनगर – अहमदनगर शहरातील पुणे बस स्थानक येथे गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 64 हजार रुपये दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात करिष्मा समीर शेख (वय 24 वर्षे, रा. शाहापुर पो.स्टे देडगाव ता. नेवासा जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जाण्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास पती समीर शेख यांच्यासह शहरातील पुणे बस स्थानक येथे पुणे एसटी बस आल्याने त्या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी करिष्मा शेख यांच्या जवळ असणाऱ्या पिवळसर रंगाची पर्स व त्यामध्ये ठेवलेले पांढरे रंगाचे पाकिट ज्या मध्ये सोन्याचा नेकलेस, गंठण, कानातील रिंगा होते ते स्वताचे आर्थिक फायदयाकरिता चोरून नेले.
ही घटना लक्षात येताच करिष्मा शेख यांनी पती समीर शेख यांच्यासह सदर पाकीटाचा पुणे स्टण्ड परिसरात शोध घ्ोतला मात्र ते कोठेही सापडले नसल्याने त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत.











