कोविड रुग्णांसाठी दर्जेदार सुविधा वेळेत उपलब्ध करुन देण्यात याव्यात- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे निर्देश

706

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराच्या सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली.

कोरोनावर उपचार घेत असताना सर्व रुग्णांना वेळेवर बेड आणि ऑक्सिजन त्याचप्रमाणे आवश्यक ती औषधे वेळेत उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी उपस्थित आरोग्य यंत्रणेला दिले.

यावेळी पाहणी करताना ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, स्वच्छतागृहे, उपलब्ध वैद्यकीय स्टाफ याबाबत आढावा घेतला.

वॉर्ड क्रमांक 5 च्या औषधशास्त्र विभागाच्या वॉर्डात असलेल्या सुविधेचा आढाव्यासह पाहणी केली. कोरोना प्रार्दूभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची खबरदारी आरोग्य यंत्रणेने घ्यावी अशी सूचना त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here